स्व. तुकाराम बाबू नाईक यांच्या स्मरणार्थ ऑर्केष्ट्रा कलाकारांना व मजुरांना आर्थिक मदत.  नवीन पनवेल परिसरातील ए - टाईप येथे अर्सेनिक अल्बम ३० औषधांचे वाटप.  

पनवेल / प्रतिनिधी : वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष रवींद्र नाईक यांचे वडील स्व . तुकाराम बाबू नाईक यांचे १२ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ  रवी नाईक यांनी कोरोना विषाणू साथीचा आजार व लॉकडाऊनमुळे असलेल्या बिकट परिस्थितीतील ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील एकूण ३४  कलाकारांना आर्थिक सहाय्य केले असून त्यांनी १२ मजुर कामगारांना देखील आर्थिक मदत देऊन त्यांची चुल पेटवली आहे.  त्याचप्रमाणे रवींद्र नाईक राहत असलेल्या नवीन पनवेल ए -टाईप भागामध्ये ३५० घरांमध्ये अर्सेनिक अल्बम 30 या औषधांचे वाटप केले व त्यांच्या गावी उलवे सेक्टर ५ येथील स्वस्तीक भिमा येथील सोसायटीमध्ये देखील सर्व रहिवाशांना औषधाचे वाटप केले आहे. रवींद्र नाईक यांचे वडील स्व. तुकाराम बाबू नाईक यांच्या स्मरणार्थ त्यांनी कलाकारांना आर्थिक मदत, मजुरांना जीवनाश्यक वस्तू व आर्थिक मदत तसेच अर्सेनिक अल्बम ३० औषधांचे वाटप केले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. तसेच सध्या कोरोना व लॉकडाऊन यामुळे ऑर्केष्ट्रा क्षेत्रातील कामगारांचा रोजगार बंद असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे त्यामुळे त्यांना आम्ही आमचे वडिल स्व. तुकाराम बाबू नाईक यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत केली व काही गरजू मजुरांना देखील आर्थिक सहाय्य करून शक्य तितकी मदत केली तसेच सध्या कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपलब्ध असलेल्या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे प्रभागात व गावी देखील वाटप केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.