पनवेल / प्रतिनिधी : लॉकडाउनच्या कालावधीत पनवेल तालुका शहर व परिसरात नामाभिक समाजची ५०० ते ६०० कुटुंब राहत असून त्यांची एकूण लोकसंख्या साधारणतः २५०० ते ३००० एव्हडी आहे. यापैकी ८० ते ९० टक्के बांधवांचा फक्त केस कर्तन करण्याचा व्यवसाय असून या व्यवसायावर ते कुटुंबांचे पालन पोषण करत आहेत. सध्याच्या कोरोना ( कोविद -१९) प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित झाल्यापासून सर्व व्यावसायिकांचे व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सुरुवातीचे कहाणी दिवस संबंधितांनी कसेतरी पुढे ढकलले परंतु आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने सध्या त्यांना एकवेळचे जेवण देखील महाग झालेले आहे. तरी पनवेल महानगर पालिकेच्या आयुक्तांनी सलून दुकाने उघडण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी पनवेल तालुका नाभिक समाज मंडळचे अधिकारी राजन भालेकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून केली आहे. परवानगी दिल्यास आम्ही शासनाच्या अटी, कोरोनाबाबतच्या अटी, सामाजिक अंतर आदींचे पालन काटेकोरपणे करू असे देखील राजन भालेकर यांनी स्पष्ट केले आहे.
पनवेल तालुक्यातील सलून घडण्यास सशर्त परवानगी द्यावी : पनवेल तालुका नाभिक समाजाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.
कोट :
सरकारला एकच सांगते ते दुकान चालू होत नाही तर तुम्ही ही अफवा पसरवू नका सलून ने कोरोना होत आहे जनतेच्या मनात तीच भीती राहिली. आज तुम्ही किराण्याचे दुकान भाजीपाला दुग्धव्यवसाय मटन मच्छी मेडिकल हे सर्व अत्यावश्यक सेवा. आणि दारूचे सेवा महिलांचे घर बरबाद नाही होणार का? त्यांनी तुमची अर्थव्यवस्था सुधारते. सर्व दुकाने चालू करा फक्त सलून नाही आम्ही मेले तरी चालतील आमचे संसार उघड्यावर पडले तरी चालतील अरे तो श्रीमंत आहे तो खाईल. पण तो गरीब आहे तो फक्त गरिबाचं लाठाच खाईल का? आता आमचा पण समाज हाय कॉलिटी ची सेवा जनतेला देईल आतातरी सरकारने डोळे उघडावे.आता तरी सरकारने आमची व्यथा ऐकून घेणे अन्यथा आम्हाला सुद्धा तुमच्यासारखाच बघून आंदोलन उपोषणाला बसावे लागले तरी चालेल आमची संसार आता उघड्यावर पडू देणार नाही : श्री. अमिषा पंडित, नवी मुंबई पनवेल रायगड.