पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले महाराज यांचे नेतृत्व असलेली व ते संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना संस्थेत महाराजांवर असलेले प्रेम व कार्याची पद्धत यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी राजे प्रतिष्ठानमध्ये प्रवेश केला आहे. राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्ह्यातील व पनवेल तालुक्यातील काम पाहता अनेकांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमध्ये काम करण्यासाठी तयारी दाखवली असून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्यासाठी काम करण्याची आमची संपूर्ण तयारी आहे असे देखील बोलताना काहींनी सांगितले. नुकतेच राजे प्रतिष्ठान अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटक श्री.अशोक (अच्चूभाई) शिगवण, राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कामगार सेना उपाध्यक्ष श्री.नारायण अण्णा कोळी, मा.श्री.मंगेश भाऊ लाड, चिटणीस महाराष्ट्र राज्य कामगार सेना, श्री.चंद्रकांत (मामा) धडके राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सरचिटणीस व मुंबई संघटक श्री.प्रकाश कोळी यांच्या मार्गदर्शनाने व रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या नेतृत्वात खांदा कॉलनी व नावडा विभाग अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. खांदा कॉलनी विभाग अध्यक्षपदी श्री. मछिंद्र पाटील व नावडा विभाग अध्यक्षपदी श्री. विलास गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमध्ये आम्ही जोमाने काम करू व महाराजांना अभिप्रेत काम करू असे आश्वासन यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
राजे प्रतिष्ठानच्या कामगार सेनेच्या खांदा कॉलनी विभाग अध्यक्षपदी मछिंद्र पाटील तर नावडा विभाग अध्यक्षपदी विलास गायकवाड यांची निवड.
राजे प्रतिष्ठानच्या कामगार सेनेच्या खांदा कॉलनी विभाग अध्यक्षपदी मछिंद्र पाटील तर नावडा विभाग अध्यक्षपदी विलास गायकवाड यांची नि
वड.