सुहासिनी नायडू यांच्याकडून नेरूळमध्ये औषध फवारणी. 


नेरुळ / प्रतिनिधी : नेरुळ येथील सेक्टर २ व ४ मधील सर्व सोसायट्यांमध्ये भाजपच्या युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांच्याकडून स्वखर्चाने औषध फवारणी करण्यात आली. नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिक चिंतेत आहेत. गेले ५० दिवस लॉकडाऊन सुरु असल्याने दर १० दिवसांनी या सर्व सोसायट्यांमध्ये सुहासिनी नायडू यांच्याकडून फवारणी केली जात आहे. तसेच नियमितपणे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जागृती केली जात आहे.