राजे प्रतिष्ठान कामगार सेना , पत्रकार मित्र असोशिएशन व सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या संयुक्त विद्यमाने रिक्षाचालकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप.  

पनवेल / प्रतिनिधी : कोरोना विषाणू साथीचा आजार रोग दिवसेंदिवस वाढत चालला असून यामुळे लॉकडाऊन देखील शासनाला वाढवावा लागत आहेत. लॉकडाऊन केल्यामुळे अनेकांचे धंदे बुडाले असून काहींच्या नोकऱ्या देखील जाण्याच्या मार्गावर आहेत अशातच आता जून महिना उजाडणार असून शाळा देखील सुरु होणार असल्याच्या बातम्या देखील येत असल्याने आता मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या शालेय साहित्यांची चिंता नागरिकांना सतावत आहे. याची जाणीव ठेवूनच आज राजे प्रतिष्ठान कामगार सेना , पत्रकार मित्र असोशिएशन व सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या रिक्षाचालकांच्या मुलांसाठी वही, पेन, पेन्सिल, खोडरबर अशा शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, पत्रकार मित्र असोशिएशनचे सहसचिव व सत्यमेव जयते ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष संतोष आमले, कैलास रक्ताटे, अक्षय घाडगे, यांच्यासह महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष दिनेश जाधव यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.