कॅलॉन स्किन केयर सेंटरच्या संचालिका डॉ. सोनाली कलगुडे यांच्यावतीने खारघर पोलिसांना होमिओपॅथी औषधांचे वाटप. 


पनवेल / प्रतिनिधी : खारघर येथील कॅलॉन स्किन केयर सेंटरच्या संचालिका डॉ. सोनाली कलगुडे यांनी खारघर पोलीस ठाणे व खारघर वाहतूक नियंत्रण विभागाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी औषधांचे वाटप केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून यादरम्यान पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. महाराष्ट्र पोलीस आपले घर दार सोडून व जीवाची पर्वा न करता दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. पोलीस सातत्याने शारीरिक व मानसिक तणावाखाली जीवन जगात आहेत. त्यातच सध्या पोलिसांना देखील कोरोनाची लागण होण्याच्या बातम्या येत असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी अधिक तणावाखाली असल्याचे जाणवत आहे. याचाच एक मदतीचा हात म्हणून खारघर येथील कॅलॉन स्किन केयर सेंटरच्या संचालिका डॉ. सोनाली कलगुडे यांनी खारघर पोलीस ठाणे व खारघर वाहतूक नियंत्रण विभागाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला. समाजाप्रती आपणही काही देणे लागतो या भावनेतून समाज हितासाठी व देशसेवेसाठी झटणाऱ्या पोलिसांना सहकार्य करणे तसेच त्यांना शक्य तितकी मदत करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे डॉ.सोनाली कलगुडे यांनी बोलताना सांगितले. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण यांच्याकडे हि औषधे सुपूर्द करण्यात आली. यावेळी माझं साम्राज्यच्या संचालिका साक्षी सागवेकर व पुष्पा जाधव यांनी सहकार्य केले.