सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना नवीन पनवेल शहर संघटक जगदीश शेळके आणि शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख रुपेश ठोंबरे यांनी केले आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  


पनवेल दि.06 (वार्ताहर)- कोरोना विषाणूच्या रूपाने आपल्या देशावर आलेल्या महाभयंकर संकटाचा सामना करण्याकरिता महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कठोर पाउले उचलली आहेत याचाच महत्वाचा भाग म्हणुन संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशातच मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.           अशातच आपल्या समाजाविषयी आपले कर्तव्य म्हणून आणि हिंदुहृदयसम्राट सन्मानीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार २०% राजकारण आणि ८०% समाजकारण याच अनुकरण करून शिवसेना नवीन पनवेल शहर संघटक जगदीश शेळके आणि शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख रुपेश ठोंबरे (बिनधास्त) यांनी नवीन पनवेल येथील आदई आदिवासी वाडी येथे गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे जवळ जवळ १-२ आठवडे पुरेल एवढा अन्नधान्याचे १०० बॉक्स वाटप करण्यात आले. यावेळी उपशहरप्रमुख भिमजीभाई मोकरिया, शाखाप्रमुख  रोहन गायकवाड, विभाग संघटक उमेश भगत, युवासेना विभाग अधिकारी कु.नचिकेत म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.