पनवेल,(प्रतिनिधी) -- कोरोनामुळे मावा, पान, गुटखा, गांजा, आणि दारू यांची होम सर्व्हिस सुरु नवीन पनवेलसह काही भागात सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अत्यावश्यक सेवेप्रमाणे या अमली पदार्थांची विक्री घरातून होत आहे. दोन दिवसापूर्वी राजे प्रतिष्ठानच्या पधिकाऱ्यानी नवीन पनवेल परिसरातून एका घरातून 10 बॉक्स विमल, रजनीगंधा, गुटखा जप्त करून खांदेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे. यामुळे हा साठा जप्त केल्यामुळे येथील परिसरातील नागरिकांवर आता शंभर रुपयेचा मावा आणि दिवसभर चावा अशी परिस्थिती आल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस व आरोग्य यंत्रणा रात्रीचा दिवस करीत आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा व किराणा दुकान वगळता सर्व दुकानांचे शटर डाउन केले आहे. काही दुकाने ठराविक वेळेपुरताच सुरु असतात. देशभरात लॉकडाउनचे अनुकरण होत असताना दारू, गुटखा, सिगारेट, अश्या प्रेमींचा मात्र तल्लफ भागविण्यासाठी पहाटेपासूनच विक्रेत्यांच्या दारात गर्दी करीत आहेत. काही ठिकाणी तर चढ्या दराने या पदार्थाची विक्री होत आहे. दिवसभराचा स्टॊक सकाळी-सकाळीच संपत आहे. यामध्ये फक्त ओलकीच्या व नेहमीच्या ग्राहकांना सर्व्हिस मिळत आहे. गुटख्याच्या पुड्यांसाठी नवीन पनवेल येथील एका घरातून विक्रीसह होम डिलिव्हरीची सर्व्हिस पुरवली जात आहे. कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी पोलीस आपला घरदार सोडून जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे आहेत. यासाठी सर्व पोलीस बल बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा या बेकायदेशीर धंदेवाल्यानी घेतला आहे. मात्र सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी अनेक मुजोर धंदेवाल्याना त्यांची जागा दाखवत त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यास भाग पाडले आहे. महाडिक यांना नवीन पनवेल ए टाईप परिसरात एका घरामध्ये गुटख्याच्या साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी जाऊन विमल, गुटखा, रजनीगंधा असे पुड्या जवळपास 10 बॉक्स भरलेले असलेले गुटखा जप्त करीत खांदेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती महाडिक यांनी दिली. याबाबत महाडिक यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे या लॉकडाऊन काळात बंदी असलेली पदार्थ सर्रासपणे विक्री होत असून त्यांच्या विशेष पथकाकडून कारवाई करण्यात यावी अशी विनंती पत्र देण्यात आले आहे.
चौकट :
धंद्याना पाठबळ देण्याऱ्यांवर कारवाई करा....
कोरोनाचा प्रसार वाढू नये या पार्शवभूमीवर जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने, पान टपरी, अश्या पदार्थ विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे व्यसनी लोकांचे हाल झाले आहेत. मात्र जणांनी शक्कल लढवीत घरातूनच विक्री करण्याचे धंदे सुरु केले आहेत. यामध्ये यांचे दुप्पट दर आकारले जात आहे. अश्या पदार्थ पुढील आदेश येईपर्यन्त विक्रीसाठी बंद करण्याचे आदेश असताना देखील घरातून सर्रास विक्री होत आहे. मात्र या धंद्याना पाठबळ देण्यारयांवर थेट कारवाई करावी अशी मागणी राजे प्रतिष्ठानचे जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.