*राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे गोर - गरीब व विविध आदिवासी पाड्यांवरील मुलांना दाखविण्यात आला तानाजी चित्रपट.*   *राजे प्रतिष्ठान पनवेल यांचा कौतुकास्पद उपक्रम. प्रथमच सिनेमागृहात जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद.** 

पनवेल / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात राजे प्रतिष्ठान कार्यरत आहेत. पनवेल - रायगड विभागामध्ये संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, कार्याध्यक्ष नितीन शिंदे, महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण कोळी व राजू मरे, तसेच मुंबई संघटक चंद्रकांत धडके व मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी पनवेल तालुक्यातील गोर - गरीब मुले व आदिवासी पाड्यांवरील मुलांना तानाजी सिनेमा मोफत दाखविला. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व त्यावेळेस महाराजांप्रती असलेली प्रत्येक मावळ्याची निष्ठा व स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांची माहिती या चित्रपटातून लहान मुलांना मिळाली. राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा सांघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार म्हणजेच ज्या मुलांनी वा लोकांनी कधीही सिनेमागृह पाहिलेला नाही अशा लोकांना प्रथमच सिनेमागृहात तानाजी सिनेमा दाखविण्यात आला. १०० ते १५० हुन अधिक लहान मुले व नागरिक यांनी सिनेमा पहिला व राजे प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतूक केले व राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांचे कार्य छत्रपतींना अभिप्रेत असे कार्य आहे. आपल्याहून अधिक लोकांचा विचार करणे ते देखील आजच्या काळामध्ये व कोणताही स्वार्थ हेतू न ठेवता करणे व गोर - गरिबांसाठी व अडल्या नडलेल्याना मदत करण्याचे काम हे नेहमीच राजे प्रतिष्ठान पनवेल यांच्याकडून होत आहे असे मत उपस्थित नागरिकांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, जेष्ठ पत्रकार सुमंत नलावडे, खारघर शहर महिला अध्यक्षा ऍड. संतोषी चव्हाण, विनोद पिंगळे, कल्पेश चव्हाण, कल्पेश देशमुख, संदीप गर्जे, निनाद सेल, शीतल शिंदे, धनिषा सोरखदे, सविता सोरखदे आदी उपस्थित होते.