*राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे दुर्गंधी न येण्यासाठी सार्वजनिक शौचालयांबाहेर अत्तराचा सुवास व सुगंधित चाफा फुलांचे वाटप. पनवेल शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाचे वेधले लक्ष.*

*राजे प्रतिष्ठान पनवेलतर्फे दुर्गंधी न येण्यासाठी सार्वजनिक शौचालयांबाहेर अत्तराचा सुवास व सुगंधित चाफा फुलांचे वाटप. पनवेल शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाचे वेधले लक्ष.*                                                                              पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महानगर पालिकेचे अधिकारी हे स्वच्छतेबाबत जनजागृती करीत असताना स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये अव्वल येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी जाहिरात व बॅनरद्वारे देखील प्रचार पनवेलमध्ये सुरु आहे. मात्र पनवेलमधील सार्वजनिक  शौचालय व मुताऱ्या यांची दयनीय अवस्था पाहता गरिबांचे यांना काही देणे घेणे नाही असे दिसून येते. अनेक ठिकाणी शौचालयांबाहेर रिक्षा स्टॅन्ड, हॉस्पिटल, बाजारपेठ, दुकाने आहेत व याठिकाणी नागरिकांची वर्दळ सुरु असते मात्र शौचालयांतुन येणाऱ्या दुर्गंधीतून अनेक जण ट्रस्ट असून काही दुकानदार व रिक्षाचालक यांना आजरपण देखील लागले आहेत. काही शौचालयांबाहेर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व ओळखून तला प्रथम प्राधान्य देत स्वच्छ भारत अभियानाला चळवळीचे स्वरुप दिले आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वत: हाती झाडू घेऊन  ना गंदगी करेंगे, ना करने देंगे चा मंत्र दिला. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी चौक, बंदर रोड, वाल्मिकी नगर, कोहिनुर टेक्निकल जवळ, छत्रपती संभाजी महाराज मैदान, गुजराथी स्मशान भूमी व इतर ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक शौचाल व मुताऱ्यांची दयनीय अवस्था आहे. याठिकाणी गेल्यानंतर बाहेरून जरी स्वछ भारत अभियानाचे बॅनर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र  दुर्गंधी, घाण यांचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. चमकोगिरीसाठी हातात झाडू घेणाऱ्यांनी या ठिकाणी कदाचित स्वछता अभियान राबविले नसेल किंवा विसरले असतील तरी याबाबत प्रशासनाला जागे करण्यासाठी  राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हाध्यक्ष केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार व नेतृत्वात याठिकाणी शौचास व लघुशंका करण्यास येणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक शौचालयाबाहेर उभे राहून दुर्गंधी न यावी यासाठी अत्तराचा सुवास व सोबत चाफा या सुगंधित फुलांचे वाटप करून स्वच्छतेबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. निदान यानंतर तरी पनवेल महानगर पालिकेचे अधिकारी जागे होतील व याठिकाणी स्वच्छता करतील व नागरिकांना दुर्गंधीपासून सुटका मिळेल मात्र त्यानंतरही जर का प्रशासन जागे न झाल्यास स्वच्छ सर्वेक्षण पाहणी करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना राजे प्रतिष्ठानतर्फे याठिकाणची सर्व घाण व मलिदा भेट म्हणून देण्यात येईल याची नोंद पालिकेच्या अधिकारी वर्गाने घ्यावी असे देखील यावेळी केवल महाडिक यांनी सांगितले. राजे प्रतिष्ठानच्या अनोख्या व कल्पक उपक्रमांचे पनवेलच्या नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. यावेळी राजे प्रतिष्ठानचे खांदा कॉलनी अध्यक्ष किरण पालये, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, सचिव गंगाराम शिंदे, विनोद पिंगळे, वैभव पाटील, सिद्धेश भालेकर, सचिन गणेचारी, नितीन गणेचारी, अनिकेत अंकुश, संजू कतोरिया, सोनू चव्हाण, अनिकेत मोरे, विजय पाबळे, अक्षय पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.